मुंबई : पुढचे दोन आठवडे महाराष्ट्रात पाऊस दडी मारणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. त्यामुळे आता रब्बीच्या पेरण्याच धोक्यात आल्या आहेत. पुढचे दोन आठवडे पाऊस पडणार नसेल, तर पोळ्यानंतर सुरू होणाऱ्या रब्बीच्या पेरण्या कशा करायच्या असा प्रश्न आता शेतकऱ्यांना पडला आहे.


उकाड्यानं हैराण


भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर कमी दाबाचा पट्टा तयार होणार आहे. पण त्याचा महाराष्ट्राला फारसा फायदा होणार नाही असं हवामान खात्याचा अंदाज आहे. गेल्या दोन तीन दिवसात मुंबईत पावसाची हजेरी नसल्यानं वातावरणातला उकाडा वाढतोय. त्यासोबत तापमानही वाढलंय. त्यामुळे शहरी जनता उकाड्यानं आणखी हैराण होणार असं दिसतंय.