औरंगाबाद : एमआयएमचा वादग्रस्त नगरसेवक सयय्द मतीनवरून महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ झाला आहे. मतीनला सर्वसाधारण सभेत येवू द्या अशी मागणी एमआयएम नगरसेवकांनी केली. भाजपकडून मतीनच्या प्रवेशाला कडाडून विरोध झाला. भाजप गटनेत्यांनी सय्यद मतीनला येवू न देण्याचा प्रस्ताव मांडला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महापौरांनी मतीनला महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत येण्यापासून रोखल्याने एमआयएमच्या नगरसेवकांनी गोंधळ घातला. गोंधळ घालणाऱ्या एमआयएमच्या 9 नगरसेवकांचे एक दिवसासाठी निलंबन करण्यात आले आहे. महापौरांच्या आदेशानंतर या नगरसेवकांचे निलंबन करण्यात आले आहे.


काही दिवसांपूर्वी देखील नगरसेवक सय्यद मतिन याने महापालिकेच्या सर्वसाधारण सभेला येण्याचा प्रयत्न केला होता. मात्र महापौरांनी त्याला प्रवेश नाकारला. मतिन यानं वाजपेयींच्या श्रद्धांजली प्रस्तावाला विरोध केला होता. त्यानंतर भाजप नगरसेवकांनी त्याला सभागृहातच चोप दिला होता. त्यानंतर त्याचं सदस्यत्व रद्द करण्याचा प्रस्ताव सुद्धा पाठवण्यात आला आहे.


या घटनेनंतर सय्यद मतिन अनेक दिवस जेलमध्ये सुद्धा होता. मात्र जेलमधून सुटल्यानंतर पुन्हा त्यानं सभागृहात येण्याचा प्रयत्न केला असता त्याला मज्जाव करण्यात आला होता.


काय झालं होतं ?


औरंगाबाद पालिका सभागृहात भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यास नगरसेवक सय्यद मतिनने विरोध केला होता. त्यानंतर भाजपाच्या नगरसेवकांनी त्याला मारहाण करत पालिकेच्या बाहेर काढलं होत.


या मारहाणप्रकरणी भाजपच्या पाच नगरसेवकांना अटक करण्यात आली होती. मारहाण झालेला एमआयएमचा नगरसेवक सय्यद मतीन यानं याबाबत तक्रार दाखल केली होती. भाजप गटनेते प्रमोद राठोड, उपमहापौर विजय औताडे, नगरसेवक राजगौरव वानखेडे, माधुरी अदवंत आणि रामेश्वर भादवेंविरोधात गुन्हा दाखल झाला होता.