पुणे : पुण्यातील इफ्को टोकिओ विमा कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणी ९ शिवसैनिकांना अटक करण्यात आलीय. ६ नोव्हेंबर रोजी शिवसैनिकांनी राज्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे तातडीने मिळावेत या मागणीसाठी हिंसक आंदोलन केलं होतं. यापूर्वी वेळोवेळी निवेदनं देऊनही कंपनीकडून शेतकऱ्यांना मदत मिळाली नसल्यामुळे हिंसक पद्धतीनं आंदोलन केलं होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरेगाव पार्क परिसरातील मंगलदास रोजवर इफ्को टोकिओ कंपनीचं कार्यालय आहे. या कार्यालयात कामकाज सुरु होत असताना शिवसैनिक येथे पोहोचले आणि कार्यालयाची मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली.


शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेतली आहे. सत्तेत आल्यास शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करु असं देखील त्यांनी म्हटलं आहे. शिवाय बँकांनी शेतकऱ्यांना नोटीसा पाठवू नये असं देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं.


याआधी शेतकऱ्यांना नडाल तर शिवसेना आपल्या स्टाईने उत्तर देईल, असा इशारा देण्यासाठी आज शिवसेनेने पीक विमा कंपन्यांच्या विरोधात मोर्चा काढला होता.


पीक विमा योजनांवर विमा कंपन्यांच्या मस्तवाल बोंडआळया बसल्या आहेत. आदी प्रश्नांना वाचा फोडून शेतकऱ्यांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी शिवसेना रस्त्यावर उतरेल असं देखील याआधी शिवसेनेने म्हटले होते.


<iframe width="560" height="350" src="
https://zeenews.india.com/marathi/live/embed" frameborder="0" allow="accelerometer; autoplay; encrypted-media; gyroscope; picture-in-picture" allowfullscreen></iframe>