पुण्यातील निरुपमा आजी आणि सायकल प्रवास
वय झालं म्हणून हळहळ करणारे बरेच. पण आयुष्याच्या संध्याकाळीही प्रत्येक क्षण भरभरुन जगणारे तसे थोडेच. त्यापैकीच एक पुण्यातल्या निरुपमा भावे.
अश्विनी पवार, पुणे : वय झालं म्हणून हळहळ करणारे बरेच. पण आयुष्याच्या संध्याकाळीही प्रत्येक क्षण भरभरुन जगणारे तसे थोडेच. त्यापैकीच एक पुण्यातल्या निरुपमा भावे.... पाहुया सध्या त्या कसली तयारी करतायत. पुण्यात प्रभात रोडवर राहणाऱ्या या निरुपमा भावे. पुण्यातल्या सायकल ट्रॅकवर येऊन त्या नियमितपणे सायकलिंगचा सराव करतात.
वयाच्या सत्तरीही प्रवास
फक्त पुणेच नाही तर पुण्याच्या आजूबाजूचा कामशेत, नगर , रांजणगाव ही ठिकाणंही त्यांनी सायकलवरुन पालथी घातलीयेत.. त्यांची ही सगळी तयारी सुरु आहे ती पुणे ते कन्याकुमारी या सायकल सफारीसाठी....या प्रवासासाठी 19 डिंसेंबरला त्या आपल्या 9 जणांच्या संघासह पुण्याहून रवाना होतील आणि 3 जानेवारीला कन्याकुमारीला त्यांचा प्रवास संपेल. वयाची सत्तरीही या प्रवासादरम्यान सायकलिंग करता करताच साजरी होणार आहे.
पहिला वहिला सायकल प्रवास
वयाच्या सत्तरीमध्येही अंत्यत सुदृढ आणि उत्साही असणा-या निरुपमा भावे यांनी 18 वर्षांपूर्वीपासून सायकल चालवायला सुरुवात केली. पुण्यातल्या सायकल प्रेमींबरोबर त्यांना वाघा बॉर्डर ते अमृतसर अशा सायकल सफारीत एकदा सहभाग घेतला. हा पहिला वहिला सायकल प्रवास निरुपमा यांच्यासाठी एक वेगळाच अनुभव देणारा ठरला. त्यानंतर त्यांना सायकल सफरीच्या वेडानं झपाटलं. त्यानंतर त्यांनी राजस्थान, सौराष्ट्र,भुवनेश्वरर, लेह लडाख अशा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी सायकल वरुन प्रवास केला...त्य रोज सायकल चालवणं हेच त्यांच्या फिटनेसचं रहस्य असल्याचं त्या सांगतात.
सायकल प्रवासाच्या पुढे जाऊन ट्रायथलॉन सारख्या स्पर्धेत उतरण्याची त्यांची इच्छा आहे.... त्यासाठी त्या सध्या पोहणं आणि जिममध्ये त्या प्रशिक्षण घेतायत. एकेकाळी सायकलिंचं शहर अशी ओळख असणा-या पुण्यामध्ये आज वाहनांची संख्या वाढतीये....तर दुसरीकडे पुणेकर सायकल चालवण्याबरोबरच फिटनेसच्या बाबतीतही उदासिन झालेले दिसतात. मात्र सत्तराव्या वर्षातही सायकल चालवणा-या भावे आज्जीनीं मात्र एक वेगळा पायंडा पाडलाय.