नागपूर : भाजप आमदारांसाठी आज नागपूरच्या संघ मुख्यालयात बौद्धिक वर्गाचं आयोजन करण्यात आलं होतं. यासाठी संघाच्या मुख्यालयात बौद्धिकासाठी देवेंद्र फडणवीस पोहोचले, हे नेहमीच घडतं. चंद्रकांत पाटील रेशीमबागेत पोहोचले, हेही नेहमीचंच. आशिष शेलार दाखल झाले, तेही नेहमी येतात. पण या बौद्धिकाला नितेश राणे पोहोचले. राणेंपाठोपाठ राधाकृष्ण विखे पाटील आणि मग गणेश नाईक आले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले रेशीमबागेत येऊन आनंद वाटला. तर गणेश नाईकांना संघानं देशप्रेम आणि त्याग शिकवला. संघाच्या बौद्धिकात बरंच काही शिकवलं गेलं. पण पक्षांतर बरंच काही करायला लावतं. एवढा बौद्धिकाचा धडा भाजपच्या नव्या नेत्यांनी नक्कीच घेतला असेल.