मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा लहान मुलगा आणि भाजप आमदार नितेश राणे हे सिंधुदूर्ग न्यायालयात शरण गेले आहेत. नितेश राणे यांनी मुंबई हायकोर्टात जामीनासाठी अर्ज केला होता, पण तो त्यांनी आज मागे घेतला आहे. नितेश राणे यांचा सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने जामीन नाकारला होता. नितेश राणे यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. न्यायालयीन कोठडी न देण्यासाठी त्यांनी कोर्टात जामीन अर्ज सादर केला आहे. न्यायालयाबाहेर दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कालच नितेश राणे यांना अटक होणार होती, पण त्यांनी सुप्रीम कोर्टानुसार १० दिवस अटक करता येणार नाही, असं कारण सांगितलं होतं, पण हा कोर्टाच्या निर्णयाचा अवमान होईल असं सांगून त्यांचे वकील सतीश माने शिंदे यांनी सांगितलं की, नितेश राणे हे चौकशीस सामोरे जाण्यास तयार आहेत, यासाठी शरणागती पत्करावी लागली तरी चालेल.


 करंजे गावचे माजी सरपंच संतोष परब यांच्यावरील जीवघेणा हल्ला प्रकरणी नितेश राणे यांनी शरणागती पत्करली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणूक प्रचार दरम्यान हा प्रकार झाला असल्याचं सांगण्यात येत आहे. सुप्रीम कोर्टाच्या नियमानुसार नितेश राणे यांना अटक करण्यासाठी आणखी ५ दिवस आहेत.