नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा साठावा वाढदिवस, नागपुरातल्या कस्तुरचंद पार्कमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्याला विविध राजकीय पक्षांचे मातब्बर नेते उपस्थित होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सर्वच नेत्यांनी गडकरींच्या प्रभावी कार्यशैलीचं यावेळी विशेष कौतुक केलं. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गडकरी दाम्पत्याचा गौरवपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. 


गडकरींच्या वाढदिवस निमित्तानं नागपूरकरांनी १ कोटी १ लाख रुपयांची लोकवर्गणी जमा केली. या रकमेचा धनादेश यावेळी नितीन गडकरींना सुपूर्द करण्यात आला. या निधीत स्वतःकडचीही रक्कम जोडून गडकरींनी ही रक्कम सामाजिक संस्थांना प्रदान केली.