...म्हणून आमची मनं जुळतात; नितीन गडकरी यांच्या भेटीनंतर राज ठाकरेंनी सांगितलं कारण
नागपुरात येण्याचं अजून एक कारण मिळाल म्हणत राज ठाकरेंकडून कौतुक
मनसे (MNS) अध्यय राज ठाकरे ( Raj Thackeray) यांनी आज नागपूर (Nagpur) दौऱ्यावर असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या नागपूरातील फुटाळा तलाव येथील जागतिक दर्जाच्या फाऊंटेनचा आनंद लुटला.
नितीन गडकरी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला हा म्युझिकल फाउंटन शोला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थिती लावली होती.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपुरातील फुटाळा तलाव येथे जागतिक दर्जाचे म्युझिकल फाउंटन उभारण्यात आले आहे. या फाउंटन शोमध्ये नागपूरचा आज पर्यंतचा संपूर्ण इतिहास रेखाटला आहेय. दरम्यान, नितीन गडकरी यांच्या विशेष आग्रहास्तव राज ठाकरे यांनी या फाउंटन शोचा आनंद लुटला.
शो संपल्यानंतर गडकरी आणि राज ठाकरे एकत्र व्यासपीठावर आले. या फाउंटन शोचे नाव लता मंगेशकर यांचे नाव देण्यात येणार आहे, असे नितीन गडकरी म्हणाले. यावेळी बोलताना नितीन गडकरी यांनी सांगितले की, "तलावाच्या मध्यभागी 80 हजार चौरस फुटांचे सोलार छत असलेले एक हॉटेल उभारणार आहे. बोटीमधून या हॉटेलमध्ये जाता येणार आहे. मागच्या बाजूला पार्किंगची व्यवस्था असेल."
नागपुरात येण्याचं अजून एक कारण मिळाल - राज ठाकरे
"मी असं काही आजपर्यंत भारतात पाहिलेलं नाही. नितीन गडकरी जे काही करतात ते सर्व भव्य दिव्य असतं. त्यामुळे आमचे विचार जुळतात. आता नागपुरात येण्याचं अजून एक कारण मिळालय. हे अदभुत आहे. देशातील लोक इथे येतील," असे राज ठाकरे म्हणाले.