Good News : राज्यातील रस्ता कामांना वेग येणार, केंद्रीय मंत्री गडकरींची मोठी घोषणा
राज्यातील (Maharashtra) रस्ते बांधणासाठी वेग येणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांनी मोठी घोषणा केली आहे.
मुंबई : राज्यातील (Maharashtra) रस्ते बांधणासाठी वेग येणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांनी मोठी घोषणा केली आहे. अनेक महत्वाच्या राष्ट्रीय तसेच राज्य महामार्गांच्या कामासंदर्भात मोठी घोषणा करताना तब्बल 2780 कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे राज्यातील रस्त्याचे जाळे अधिक सक्षम होण्यास आता मदत होणार आहे. यात कोकण ते विदर्भातील कामांचा समावेश आहे. (Road Works In Maharashtra)
गडकरी यांनी राज्यभरातील वेगवेगळ्या रस्त्यांच्या कामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी जाहीर केले आहे. त्यांनी याबाबत ट्विट केले आहे. गडकरी यांनी कोणते रस्ते करण्यात येणार आहेत, याचे अनेक ट्विट केले आहेत. यामध्ये कोकण विकासाला चालना देण्यासाठी अनेक महत्वाच्या प्रकल्पांचा समावेश असल्याचे दिसून येत आहे. राज्यातील या कामांसाठी 2780 कोटींहून अधिक निधी मंजूर करण्यात आला आहे.
नितीन गडकरी यांनी प्रगतीका हायवे या हॅशटॅग अंतर्गत महाराष्ट्रातील वेगवेगळ्या रस्त्यांची पुन:बांधणी आणि विस्तारीकरण करण्यासाठी मंजूर झालेल्या निधीसंदर्भात माहिती दिली. राष्ट्रीय महामार्ग 166 E वरील गुहार - चिपळूणला जोडणाऱ्या रस्त्याचे काम करण्यासाठी 171 कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याचे त्यांनी ट्विटरवरुन सांगितले आहे. तसेच Tarere – Gaganbawda – Kolhapur या राष्ट्रीय महारमार्ग 166जीवरील रस्त्याच्या कामासाठी167 कोटी रुपये देण्यात आहे.
तसेच जळगाव-मनमाड राष्ट्रीय महामार्ग 753 J च्या विस्तारीकरणासाठी 252 कोटी रुपये मंजूर केले आहेत. हा रस्ता दोन पदरी किंवा चार पदरी करण्यात येणार आहे. तर गडचिरोली तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग 353सीवरील 262 किमी ते 321 किमीच्या अंतरामध्ये 16 लहान मोठे पूल बांधण्यात येणार असल्याची घोषणाही गडकरींनी केलीय. यासाठी 282 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
राष्ट्रीय महामार्ग 752 आयवरील वातूर ते चारथाना दरम्यानच्या रस्त्याच्या काम करण्यासाठी 228 कोटी रुपये तर तिरोरा ते गोंदियादरम्यानच्या राष्ट्रीय महामार्ग 753 च्या दोन पदरी रस्त्याचं बांधकाम करण्यासाठी 282 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेत. तसेच तिरोरा गोंदियादरम्यानच्या राज्य महामार्गाच्या गांधकामासाठी 288.13 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. राष्ट्रीय महामार्ग 753 अंतर्गत 28.2 किमीचा नवा रस्ता बांधण्यात येणार आहे.
नागपूरमध्येही आरटीओ चौक ते नागपूर विद्यापीठ कॅम्पस असा उड्डाणपूल बांधण्यासाठी तसेच राष्ट्रीय महामार्ग 53 वर वाडी/एमआयडीसी जंक्शन येथे चार पदरी उढ्डाण पूल बांधण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. यासाठी एखूण 478 कोटी 83 लाखांचा निधी मंजूर केला आहे. तर नांदेड जिल्ह्यातील येसगी गावामध्ये मांजरा नदीवर पूल बांधण्यासाठी 188 कोटी 69 लाख रुपये मंजूर करण्यात आलेत. हा पूल राष्ट्रीय महामार्ग 63 चा भाग असेल. आमगाव गोंदियादरम्यानच्या राष्ट्रीय महामार्ग 543 साठी 239 कोटी 24 लाख रुपयांचा निधी तर राष्ट्रीय महामार्ग 361F च्या परळी गंगाखेडदरम्यानच्या कामासाठी 222 कोटी 44 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.