Nitin Gadkari ना धमकी देणाऱ्याचा छडा लागला; `या` ठिकाणाहून आला होता फोन
आज सकाळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयाला धमकीचा फोन आला होता. अखेरीस हा फोन कुठून आलाय याची माहिती मिळाली आहे.
Nitin Gadkari Death Threats : आज सकाळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयाला धमकीचा फोन आला होता. अखेरीस हा फोन कुठून आलाय याची माहिती मिळाली आहे. गडकरी यांच्या कार्यालयात आलेला धमकीचा कॉल बेळगावतून आला असल्याची माहिती आहे. हा संबंधित फोन बेळगाव तुरुंगातून आल्याची माहिती पुढे येतेय. यासाठी नागपूर पोलिसांची एक टीम तातडीने बेळगावला रवाना झाली आहे.
सकाळी नितीन गडकरींना आला होता फोन
सकाळी 11:29 वाजता, 11:35 वाजता आणि 12:32 वाजता असे तीन वेळेला हे धमकीचे कॉल आले. सध्या पोलीस आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात पोहोचले आहेत, आणि चौकशी केली जात आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात धमकीचे तीन फोन आल्यानंतर वर्धा मार्गावरील त्यांचं निवासस्थान असलेल्या enrico hights बाहेरही पोलीस सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. तपास यंत्रणांचे अधिकारीही तिथे दाखल झाले आहेत.
गडकरींच्या सुरक्षेत वाढ
धमकीच्या फोननंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे, त्याचे दिवसभरातील कार्यक्रम असून त्या अनुषंगाने काळजी घेतली जात आहे. फोन कुठून आला याची माहिती पोलिसांकडून घेतली जात होती. सायबर क्राईमने याबाबत तपास केला.