नितीन गडकरींची पुणे नगर नियोजन विभागावर जोरदार टीका
शहराचे नियोजन करण्यासाठी वीस वर्ष लावणारा नगर नियोजन विभाग हा होपलेस आहे, अशी भुक्कड संस्था मी पाहिली नाही, अशा शब्दात केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नगर नियोजन विभागावर जोरदार टीका केली आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्द प्राधिकरणाच्या वतीने चांदणी चौकातील उड्डाण पुलासह पुणे जिल्ह्यातील १६ हजार ४३० कोटी रुपयांच्या रस्त्याच्या कामाचे नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
पुणे : शहराचे नियोजन करण्यासाठी वीस वर्ष लावणारा नगर नियोजन विभाग हा होपलेस आहे, अशी भुक्कड संस्था मी पाहिली नाही, अशा शब्दात केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नगर नियोजन विभागावर जोरदार टीका केली आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्द प्राधिकरणाच्या वतीने चांदणी चौकातील उड्डाण पुलासह पुणे जिल्ह्यातील १६ हजार ४३० कोटी रुपयांच्या रस्त्याच्या कामाचे नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
आपल्याकडे कामासाठी पैसा आहे परंतु अधिका-यांना काम करायची इच्छा नाही, काम पूर्ण होण्यासाठी दंडुके घेऊन अधिका-यांच्या मागे लागावं लागत असे खडे बोलही त्यांनी यावेळी सुनावले. याचवेळी पुणे सातारा महामार्गावरील रखडलेल काम हा काळा डाग असल्याचं मान्य करत ६ महिन्यात या रस्त्याच काम पूर्ण करण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं.
केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पुण्यातील चांदणी चौक येथील उड्डाण पूलाचं भूमीपूजन करण्यात आलं त्यावेळी गडकरींनी सरकारी लालफितीवर कोरडे ओढलेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार अढळराव पाटील, खासदार अनिल शिरोळे, पालकमंत्री गिरीश बापट आणि महापौर मुक्ता टिळक यावेळी उपस्थित होते.