नागपूर : सरकारी अधिकारी आणि राजकारण्यांच्या कामाचा नेहमीच पंचनामा करणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी आता मंत्रालयातल्या कामकाजाचे वाभाडे काढले आहेत. विकासाची प्रक्रिया गतीमान झाली आहे. मात्र मंत्रालयातला प्रत्येक माणूस 'नो'चा ठप्पा घेऊन बसल्याचा टोला गडकरींनी अधिकाऱ्यांना लगावला. चालत्या गाडीच्या चाकात खीळे घालून पंक्चर करण्याची वृत्ती मंत्रालयात असल्याचाही टोला त्यांनी लगावला. पोलीस दलात गेल्या ३ वर्षांत ३० हजार विविध पदभरती केली असून, पोलीस विभागाला १०० टक्के जागा भरण्याची परवानगी दिल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यावेळी सांगितलं. 


कार्यालयं एकाच ठिकाणी आणण्याची कल्पना


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागपूर पोलीस आयुक्तालयाच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. नागपुरात पोलीस विभागातील विविध विभागांची कार्यालयं एकाच ठिकाणी आणण्याची कल्पना होती. 


आयुक्तालयाची सध्याची इमारत अपुरी


मात्र त्याकरता आयुक्तालयाची सध्याची इमारत अपुरी पडत असल्यानं, नवीन इमारतीचा प्रस्ताव पुढे आला. यातून नागपूर पोलीस आयुक्त आणि ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालायाकरता ६ मजली  पोलीस भवनाची निर्मिती केली जाणार आहे.