Nitin Gadkari Video : मोदी सरकारमध्ये सगळ्यात कार्यक्षम मंत्री म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची ओळख आहे. विदर्भात महाविकास आघाडीने भाजपचा सुपडा साफ केला. पण नागपूरमधून नितीन गडकरी यांनी भाजपचा बालेकिल्ला राखला आहे. काँग्रेस उमेदवार विकास ठाकरे यांचा दारुण पराभव करत त्यांनी विजयाची हॅटट्रिक केलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या विजयाचा आनंद त्यांनी कुटुंबासोबत खास करुन नातवंडांसोबत साजरा केला. या सोहळ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. नितीन गडकरी कितीही व्यस्त असले तरी कुटुंबाला वेळ देतात. आपले आबा जिंकले याचा आनंद नातवंडांच्या चेहऱ्यावर आणि उत्साह या व्हिडीओमधून दिसून आला. 


लाडक्या आबांसोबत फोटो काढताना सर्व नातवंड अतिशय उत्साही आणि आनंदी दिसत होते. जसा फोटो झाला तेवढ्यात ती छोटी चिमुकली म्हणाली आबा जिंकली...मग काय घरातील सदस्य आणि कार्यकर्त्यांना टाळ्या वाजवत हा आनंदोत्सव द्विगुणीत केला. 



नातीचा आनंद पाहून आजोबांच्याही चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता. गडकरींच्या विजयामुळे घरात आनंदाच वातावरण आहे. हा विजयाचा आनंद गडकरी यांनी कार्यकर्त्यांसोबत साजरा करण्यापूर्वी त्यांनी नातवंडासोबत हा आनंद साजरा केला. कुटुंबवत्सल गडकरी कायम कुटुंबासोबत कुठल्याही सण, विजय असो किंवा छोटा मोठा आनंद साजरा करताना दिसतात. हा व्हिडीओ त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर आपल्या अधिकृत अकाऊंटवर शेअर करत नागपूरकरांचे आभार मानले आहेत. 


अतिशय साधी राहणीमान, कार्यकर्त्यांसाठी वडिलांची सावली आणि विकास कामावर भर यामुळेच त्यांना विजयाची हॅटट्रिक करता आली. विदर्भात फक्त दोन मतदारसंघात कमळ फुललं असून तर एका मतदारसंघात शिंदेंच्या शिवसेनेला यश मिळालंय. तर उर्वरित 7 जागांवर महाविकास आघाडीने कब्जा केलाय. गेल्या निवडणुकीची आकडेवारी पाहता 2014 मध्ये विदर्भातील 10 मतदारसंघात कमळ फुललं होतं. पण 2019 मध्ये 9 जागांवर विजय मिळवता आला होता. पण यंदा विदर्भात भाजपला मोठा धक्का बसलाय. नागपूर नितीन गडकरी आणि अकोला अनुप धोत्रे यांनी विजय मिळवल्यामुळे दोन जागा भाजपचा वाटेला आल्या आहेत.