अटल ब्रीजवरून उतरल्यावर 14 लेनचा रस्ता तयार करणार, गडकरींची मोठी घोषणा
Nitin Gadkari On 14 lane Road: `आत्मनिर्भर भारत`साठी गाव खेड्यातील शेतकरी गरीब हे जीवनमान सुधारल्याशिवाय आत्मनिर्भर शक्य नाही, असे गडकरी म्हणाले.
Nitin Gadkari On 14 lane Road: विश्वेश्वरय्या यांनी महाराष्ट्रात 28 वर्ष काम केले. त्यानंतर ते गुजरातमध्ये गेले. त्यांनी अनेक मोठी कामे केली. विश्वेश्वरय्या यांना जयंतीनिमित्त आपण अभिवादन करत आहोत, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले. मी बांधकाम मंत्री होतो त्यावेळी अभियंता दिवस साजरा करण्याची सुरवात झाली.कुणाची प्रभावाखाली ना येतं पुरस्कार द्या असं मी सांगितल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी विविध नव्या कामांबद्दलही माहिती दिली.
'बदलतं तंत्रज्ञान, अर्थकारण आपण पाहिलं पाहिजे'
निर्माण कार्य करताना त्यात नेहमी बदल होत असतात. देश कोणते तंत्रज्ञान वापरतो त्यावर देशाची किंमत कळते. आपला जगात तिसरा नबर आहे. सगळ्यात जास्त जीएसटी भरणारी इंडस्ट्री आहे. रिसर्च ही यामध्ये महत्वाची गोष्ट आहे. आज इलेक्ट्रीक गाड्या सर्वत्र गाड्या दिसतं आहे. पुढच्या 25 वर्षांत डिझेल गाड्या दिसणार आहेत. लीथियेम बॅटरी साठा जम्मू काश्मीर येथे सापडला आहे. पुढच्या 2 वर्षात जगाचे सेमी कंडक्टर हब बनणार आहोत, असे ते यावेळी म्हणाले. जगातील सर्वात तरूण इंजिनिअर भारतामध्ये आहेत. ती आपली ताकद आहे. पेट्रोल-डिझेलला जास्त पैसे जातं आहे. संशोधन करून हेखर्च कमी होइल, असे गडकरींनी सांगितले.आपण बदलतं तंत्रज्ञान पाहिलं पाहिजे. त्यातलं अर्थकारण पाहिलं पाहिजे. संशोधक स्वप्न पाहणारे लोक असतात. त्यामूळे सगळ्यांचा आपण विचार करतो.जसा जातीवाद आहे तसा 88-99 बॅच असते. टेक्नॉलॉजी शिकवली पाहिजे. सोबत टीमवर्क सुद्धा शिकवलं पाहिजे, असे ते म्हणाले.
कचरा वापरून रस्ता तयार
आम्ही रस्त्यासाठी कचरा वापरतो.80 लाख टन कचरा वापरून रस्ता तयार करण्यात आलाय. येणाऱ्या काळात अनेक क्षेत्रांत रिसर्च करण्यात वाव आहे. मात्र 'आत्मनिर्भर भारत'साठी गाव खेड्यातील शेतकरी गरीब हे जीवनमान सुधारल्याशिवाय आत्मनिर्भर शक्य नाही. ग्रामीण भागात नवीन संशोधन झाले, त्यातून रोजगार निर्माण झाला तर लोकं शहरात येणार नाहीत, असे ते म्हणाले.
14 लेन रास्ता तयार केला जाणार
अटल ब्रीज वरून उतरल्यावर 14 लेन रास्ता तयार केला जाणार आहे. तो बेगळूर संभाजीनगरला जाणार आहे. पुणे रिंग रोड रस्ता जोडला जाणार असल्याचे ते म्हणाले. पुण्यात जे झालं आहे ते आपल्या धोरणाचं परिणाम आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था मजबूत झाली पाहिजे.आधुनिक तंत्रज्ञान शिकलो तसेच लोकसंख्या वाढवण्याचे शिकलो. टेक्नॉलॉजी समाजाचा विकास करणाऱ्या गरीब माणसाचे जीवनमान बदलणारी पाहिजे, असे ते म्हणाले.
माझ्याकडे हिंमत होती म्हणून काम करु शकलो
या देशात पैशांची कमी नाही. इमानदारी काम करणाऱ्या लोकांची कमी आहे. मी जे करु शकलो ते केवळ माझ्याकडे हिंमत होती म्हणून काम करु शकलो. हातात पैसे मिळाले की पटापट काम होते.जेवढं वजन टाकल तेवढं पटापट काम करतात, असे म्हणत त्यांनी अधिकाऱ्यांना टोमणे दिले. चंद्रकांत पाटलांची काम चांगली आहेत. त्यांनी डीम युनिव्हर्सिटी केली. ते असेपर्यंत सगळ्यात जास्त काम करुन घ्या. सरकारी यंत्रणा ही विषकन्या आहे. तुम्ही तुमच्या नॉलेजच्या जीवावर मोठे व्हा. देशाचे समाजाचे नाव करा, असे ते म्हणाले.