नागपूर : मोदी सरकारमधील गो गेटर असा लौकीक मिळवलेल्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुढील पाच वर्षांसाठी आपला कामाचा आराखडा तयार केला आहे. रस्ते बांधकामासाठी १५ लाख कोटींची गुंतवणूक करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला आहे. त्यापैकी २२ हरित महामार्ग असणार आहेत. तसेच रखडलेले प्रकल्प १०० दिवसांत मार्गी लावण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रस्ते विकास आणि लघू आणि मध्यम उद्योग ही दोन खाती गडकरींकडे आहेत. खादी आणि इतर लघू उद्योगांच्या विकासाचीही योजना गडकरींनी आखली आहे. याआधीच्या मोदी सरकारच्या काळात गडकरींनी रस्ते विकास, जलवाहतूक, गंगा स्वच्छता, जलस्त्रोत या चार मंत्रालयांचा कारभार हाकताना तब्बल १७ लाख कोटींची कामे केल्याचे गडकरी म्हणाले. त्यातली ११ लाख कोटींची कामे निव्वळ रस्ते विकासाची होती, असे गडकरी सांगतात. 


गेल्या आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत २२५ प्रकल्प अडकले होते. मात्र त्यांचा निपटारा झाल्याचे ते म्हणाले. आता केवळ २० ते २५ प्रकल्प रखडल्याचे ते म्हणाले. हे रखडलेले प्रकल्प येत्या १०० दिवसांत पूर्ण होतील असे ते म्हणाले.