यवतमाळ : कीटकनाशक फवारणीमुळे 20 शेतकरी शेतमजुरांचे हकनाक बळी गेल्यानंतर शासन प्रशासनाने चौकशीबाबत हालचाली सुरु केल्या आहेत. कृषी मंत्र्यांनी निर्देश देऊनही संबंधितांवर गुन्हे दाखल होत नव्हते मात्र गृहसचिव येताच 5 कृषीकेंद्र चालकांवर परवानगी नसताना कीटकनाशक विक्री केल्याने गुन्हे दाखल झाले, तरीही गुन्हे दाखल करण्यात वेळकाढू पणा होत असल्याचं दिसत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कृषी केंद्र चालकांनी फौजदारी कारवाईच्या भीतीनं अघोषित बंद पुकारला असून शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. राज्याचे अपर मुख्य सचिव सुधीरकुमार श्रीवास्तव यवतमाळ मध्ये दाखल झाले असून त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा घेत आरोग्य, कृषी, पोलीस, महसूल आणि वैद्यकीय महाविद्यालय प्रमुखांची झाडाझडती घेतली.


विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे देखील यवतमाळ मध्ये येऊन विषबाधितांची विचारपूस करत आहेत. तर काँग्रेसचे 5 आमदार जिल्ह्यात मुक्काम ठोकून विषबाधा प्रकरणाचा अहवाल बनवत आहे. दोषींवर कारवाईबाबत अजूनही कठोर पावलं उचलली गेली नसून विषबाधित शेतमजूरांना शासनानं जाहीर केलेली मदत अद्याप मिळालेली नाही.