एकत्र निवडणूक लढविण्याची स्वप्न बघू नका - शिवसेना
महाराष्ट्रात शिवेसेनेसोबत एकत्र निवडणूक लढविण्याच्या भाजपाच्या स्वप्नावर सेनेने पाणी फेरलंय.
मुंबई : महाराष्ट्रात शिवेसेनेसोबत एकत्र निवडणूक लढविण्याच्या भाजपाच्या स्वप्नावर सेनेने पाणी फेरलंय.
उत्तर प्रदेशमधील गोरखपूर आणि फूलपूर मधल्या हाराकिरीनंतर भाजपा मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सेनेला सोबत घेऊन लढू असे म्हटले होते.
पण भाजपासोबत युतीचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे शिवसेनेने म्हटले.
सेनेसोबत लढू
गोरखपुर आणि फूलपुरमध्ये भाजपाला सपाटून मार खावा लागला. त्यानंतर पार्टीमधील हालचालींना वेग आहे.भाजपा विरोध पाहता भाजपा नेते सेनेसोबत निवडणूक लढू शकू असे म्हटले होते. याचा शिवसेनेचे राज्यसभा सदस्य संजय राऊत यांनी समाचार घेतलाय.
युतीचा प्रश्नच नाही
आगामी निवडणूक शिवसेना आपल्या हिमत्तीवर लढेल असा निर्णय राष्ट्रीय कार्यकारणीत झाल्याचे राऊत यांनी सांगितले. त्यामूळे युती करण्याचा प्रश्नच उद्बवत नसल्याचे ते म्हणाले.
उद्धव घेणार निर्णय
जर भाजपा शिवसेनेसोबत राहून निवडणूक लढू इच्छित असेल तर यासंदर्भातील निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील असे पर्यावरण मंत्री आणि सेना नेते रामदास कदम यांनी म्हटले.