सोलापूर : केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी उड्डान योजनेतून लवकरच सोलापूरातून विमान टेक ऑफ घेणार आहे. याबाबत खासदार शरद बनसोडे आग्रही आहेत. मात्र बनसोडेंची जन्मभूमी असलेल्य पानमंगरूळ गावालात वाहतूक अवकळा असलेल्या खासदारांच्या गावचे लोक कमालीचे नाराज आहेत.


त्यांच्या गावाची व्यथा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोलापूर जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ल समाजाला जातो.  गेल्या लोकसभा निवडणुकीला सोलापूरकरांनी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव करून भाजपचे शरद बनसोडे याना निवडून दिले , सोलापूर शहराजवळील अक्कलकोट तालुक्यात पानमंगरूळ  या गावाचे रहिवाशी आहेत सध्याचे खासदार शरद बनसोडे. त्यांच्या गावाची व्यथा ही खूपच वेगळी आहे. खासदार साहेबाना चिंता आहेत ती सोलापूरच्या विमानसेवेची. 


विमान सेवा सुरु करण्याची काळजी


खासदार शरद बनसोडे सोलापूरला विमान सेवा सुरु करण्याची काळजी करतात.  मात्र त्यांच्याच गावातील लोकांना जाण्यायेण्यासाठी साधी एसटी अथवा सिटी बस सेवा नाही. गावकऱ्यांना दळणवळणाची खूप मोठी अडचण असल्याने गावातील मुलांना शाळेला जाण्यासाठी प्रचंड गैरसोयींचा सामना करावा लागत आहेत.


गावात साधा रस्ता नाही!


खासदार शरद  बनसोडे हे लोकप्रतिनिधी झाल्यानंतर गावाचा मोठा विकास होईल ही अपेक्षा होती. मात्र गावाला अद्याप रास्ता नीट झाला नाही त्यामुळे एसटी, सिटी बस नाहीत यामुळे गावकरी प्रचंड नाराजी आहे.