यवतमाळमध्ये डीजे आणि डॉल्बीमुक्त मिरवणूक
यवतमाळमध्ये विठ्ठलवाडीच्या शिवशक्ती दुर्गोत्सव मंडळाची दुर्गा विसर्जनाची मिरवणूक काढण्यात आली.
यवतमाळ : यवतमाळमध्ये विठ्ठलवाडीच्या शिवशक्ती दुर्गोत्सव मंडळाची दुर्गा विसर्जनाची मिरवणूक काढण्यात आली.
डीजे आणि डॉल्बीमुक्त निघालेल्या या पारंपारिक मिरवणुकीचे यवतमाळकरांनी स्वागत केलं. नवरात्रोत्सवात शिवशक्ती मंडळानं शेतकऱ्यांमध्ये उमेद निर्माण करणारा देखावा साकारला होता.
नऊ दिवस संपूर्ण परिसर स्वच्छ ठेवण्यावर कार्यकर्त्यांनी भर दिला. त्यानुसार देवीच्या विसर्जन मिरवणुकीत गुलाल आणि कर्णकर्कश वाद्याला फाटा देत टाळ मृदुंगाचा निनाद करण्यात आला.