राखी आणि गणेश मूर्तींवर जीएसटी नसणार
रक्षा बंधन आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं देशातील जनतेला मोठा दिलासा दिलाय
मुंबई : रक्षा बंधन आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं देशातील जनतेला मोठा दिलासा दिलाय.. राखी आणि गणेश मूर्तींना जीएसटी लागू करण्यात येणार नसल्याची महत्तवपूर्ण घोषणा केंद्रीय अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी केलीये.. रक्षा बंधन आणि गणेशोत्सव हा आपल्या परंपरेचा हिस्सा आहे. या परंपरांचा सन्मान करायला हवा असं ते म्हणाले.. राखी, गणेश मूर्ती, हस्तशिल्प, हातमागाच्या वस्तू यांना जीएसटीतून वगळण्यात आल्यानं लोकांना मोठा दिलासा मिळालाय.