रिझर्व्ह बॅक किंवा नाबार्डच्या परवानगी शिवाय कर्ज नाही - हसन मुश्रीफ
शेतक-यांना तातडीचं दहा हजारांचं कर्ज देताना अटी शिथील करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जिल्हा बँकांना केल्या आहेत.
कोल्हापूर : शेतक-यांना तातडीचं दहा हजारांचं कर्ज देताना अटी शिथील करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जिल्हा बँकांना केल्या आहेत. निकषपूर्तीचा आग्रह न धरण्याचं आवाहनही त्यांनी केलं. सेल्फ सर्टिफिकेटवर तातडीची रक्कम देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. तर बॅकांनी राजकारण न करता शेतक-यांना तात्काळ पैसै उपलब्ध करुन द्यावेत असं आवाहन महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केलं आहे.
मात्र रिझर्व्ह बॅक किंवा नाबार्ड परवानगी देत नाही तोपर्यंत थकबाकीदार शेतक-यांना 10 हजार रुपये कर्ज देणं शक्य नसल्याचं कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बॅकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी सांगितलं आहे. सरकारनं २० जून २०१६ पर्यंत थकीत असणा-या शेतक-यांना कर्ज उपलब्ध करुन द्या असं म्हटलय. पण किती रुपयांपर्यतच्या थकबाकीदार शेतक-यांना हे कर्ज द्यावं याबद्दल या परिपत्राकात स्पष्ट केलेलं नाही असंही हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे.