जळगाव : जिल्ह्यातील चोपडा इथे महाड्या तसेच आलिशान कारची विना नोंदणी रपेट गाडीच्या मालकाला चांगलीच भोवली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चोपडा इथल्या रस्त्यावर बी. सी. अवंती या सुमारे ४७ लाखांच्या स्पोर्ट्स कारची विना नोंदणी रपेट सुरु होती. या कारला जळगाव उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या पथकातील अधिकाऱ्यांनी जप्त करुन अज्ञातस्थळी ठेवले. 


चोपडा इथल्या एका जमीन विकासकाची ही कार असून पाच हजार रुपये दंड आणि ५ लाख  ९५ हजार रुपयांच्या व्याजासह कर वसूल करून या कारची अधिकृत नोंदणी करण्यात आली आहे. कारवाईनंतर आता ही कार मालकाला परत करण्यात आलीय.