किरण ताजणे, झी मीडिया, नाशिक : पर्यटननगरी म्हणून नाशिकची ओळख आहे. नाशिकमध्ये पावसाळी पर्यटनानिमित्त पर्यटकांची गर्दी होते. अशा वेळी सेल्फी काढताना दुर्घटना घडू नये, म्हणून नाशिक जिल्हा प्रशासनानं एक महत्त्वाचं पाऊल उचललंय. या सेल्फीला ब्रेक लावण्याचा निर्णय नाशिक जिल्हा प्रशासनानं घेतलाय. पर्यटकांची होणारी गर्दी आणि सेल्फी काढताना अचाट साहसातून दुर्घटना घडू नयेत, म्हणून नाशिक जिल्हा प्रशासनानं उपाययोजना आखल्याययत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाशिक जिल्हा प्रशासनानं यंदा पावसाळ्यात धोकादायक ठिकाणी ‘नो सेल्फी झोन’ ची अंमलबजावणी सुरू केलीय. याशिवाय नैसर्गिक आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांनी सज्ज राहण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्यायत.


पर्यटन स्थळी पोलिसांचं विशेष पथक तैनात असणार आहे. नाशिकमधला सोमेश्वर मंदिर परिसर, बालाजी मंदिराजवळचा धबधबा, रामकुंड, तपोवन या परिसरावर पोलिसांचं लक्ष असणार आहे. नो सेल्फी झोनमध्ये सेल्फी काढल्यास किंवा नियम तोडणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.


नाशिक जिल्हा प्रशासनानं पर्यटकांना काही महत्त्वाच्या सूचनाही केल्यायत. त्यामध्ये पर्यटकांनी आनंदाच्या भरात खोलवर पाण्यात जाऊ नका. अनोळखी ठिकाणी पोहायला जाऊ नका. वाहत्या पाण्यात उतरू नका. मोठ्या लाटा आणि पूर येतो, अशा ठिकाणांहून दूर राहा. सेल्फीच्या नादात अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घ्या, या सूचनांचा समावेश आहे.


नाशिकमधलं पावसाळी पर्यटन सुखाचं आणि सुरक्षित व्हावं, यासाठी प्रशासनानं योग्य ती खबरदारी घ्यायला सुरुवात केलीय. पण पर्यटकांनी स्वतःची काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे.