तुषार तपासे, झी मीडिया, सातारा : एकेकाळी मराठ्यांची राजधानी असलेल्या ऐतिहासीक अशा सातारा शहरात महिलांसाठी चक्क स्वच्छतागृहच नाहीत. सातारा शहराची सुंदर शहर म्हणून राज्यभरात ओळख आहे. पण शहरात महिलांसाठी स्वच्छतागृहच नाहीत हे एक भयानक वास्तव आहे. सातारा शहराला गेली अनेक वर्षापासून भेडसावणारा प्रश्न म्हणजे महिलांसाठी सुलभ शौचालयाचा...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

साडेतीन लाख लोकसंख्या असलेल्या या सातारा शहरात महिलांसाठी स्वच्छतागृहाची सोयच नसल्याची बाब समोर आली आहे. सातारा शहरात अनेक वर्षा पासून  महिलांसाठी एक ही सुलभ शौचालय नगरपालिकेच्या  माध्यमातून बांधण्यात आलेले नाही . 


त्यामुळे महिलांना आणि महाविद्यालयीन तरुणींना शहरात वावरताना मोठ्या समस्येला तोंड द्याव लागत आहे. साताऱ्यातील राजवाडा परिसरात फक्त एकच  स्वछतागृह आहे. शिवाय हे स्वच्छतागृह खूप अस्वच्छ आहे. त्यामुळे महिलांसाठी ही फार गंभीर बाब आहे.  


साताऱ्यातील मुख्य रस्त्यावर एकही स्वच्छतागृह नसल्याने महिलांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. अनेकदा याबाबत महिलांनी या विषयावर आवाज बुलंद केला. मात्र सातारा शहरातील एकही लोकप्रतिनिधीने या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष दिले नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. 


नगरपालिकेने या विषयावर दुर्लक्ष केले आहे. महिलांसाठी सुलभ शौचालय बांधावे अशी मागणी महिला वर्गातून होत आहे. याप्रकरणी सातारा नगरपालिका महिला नगराध्यक्षा माधवी कदम यांनी सातारा शहरात जागे अभावी स्वछतागृह बांधू शकलो नसल्याचे सांगितले आहे 


पण लवकरच आम्ही दोन स्वछतागृह बांधणार असल्याचे ही त्यांनी स्पष्ट केले आहे . सातारा शहराच्या नगराध्यक्षा एक महिला असून देखील त्यांना ही समस्या सोडवता आलेली नाही. आता सातारा शहरा महिलांसाठी कधी स्वच्छतागृह बांधण्यात येतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.