प्रशांत शर्मा, झी मीडिया, शिर्डी : किम जोंग उन... बलाढ्य अमेरिका असो, नाहीतर चीन... अख्ख्या जगात या उत्तर कोरियाच्या हुकूमशाहाची दहशत आहे. त्याला पाहून अनेकांचा थरकाप उडतो, पाचावर धारण बसते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र हाच किम जोंग उन अलिकडेच नगर जिल्ह्यातल्या सोनई गावातल्या रस्त्यावर फिरताना दिसला. त्यामुळं सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला.  ख-याखु-या किम जोंग उनचे अनेक डमी असल्याची चर्चा आहे. जगात मिळत्या जुळत्या चेहऱ्याची सात माणसं असतात, असं म्हणतात. 


सोनईमधला अभिषेक बाराहाते त्यापैकीच एक. अलिकडेच झी मराठीवरील चला हवा येऊ द्या कार्यक्रमात अभिषेक झळकला. आणि या बावळ्या किम जोंगला पाहून प्रेक्षक खळखळून हसले.


अभिषेक बाराहातेची हेअर स्टाईल, देहयष्टी आणि कपडे अगदी सेम टू सेम किम जोंग उनसारखेच. त्यामुळंच तर त्याला सोनईचा किम जोंग म्हणतात.



महाराष्ट्राचा हा किम जोंग उन अल्पावधीतच व्हायरल झालाय. नगरी भाषेत विनोद करणारा हा किम जोंग आणि मराठमोळा डोनाल्ड ड्रम्पतात्या यांची मिश्किल केमिस्ट्री चला हवा येऊ द्या मध्ये पाहायला मिळणाराय. यानिमित्तानं या हुकूमशाहावर हसण्याची आयती संधी तुम्हाआम्हाला मिळालीय.