मुंबई :  Eknath Shinde's Facebook post : शिवसेनेतली सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आल्यानंतर मोठा राजकीय भूकंपाचे संकेत मिळाले आहेत. शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असून ते नॉट रिचेबल आहेत. त्यांच्यासोबत अनेक शिवसेना आमदार आहेत. शिंदे हे भाजपमध्ये जाण्याचे संकेत मिळत आहेत. एकनाथ शिंदे यांनी फेसबुकवर थोड्यावेळापूर्वी सूचक पोस्ट केलीय. संतुलित मन सुखी निरोदी समृद्ध जीवनाचा राजमार्ग म्हणजे योग असल्याचं त्यांनी या पोस्टवर म्हटले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेनेचे 21 आमदार एकनाथ शिंदे यांच्यासह असल्याची माहिती समोर येत आहे. महाविकास आघाडी सरकारचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईच स्वतः शिंदे यांच्यासह नॉटरिचेबल आहेत. महाविकास आघाडीचे शिवसेनेचे तीन मंत्री शिंदे यांच्यासह गायब आहेत. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, सिल्लोडचे अब्दुल सत्तार आणि पैठणचे मंत्री संदीपान भुमरे हेही शिंदे यांच्यासह नॉट रिचेबल आहेत. यात शिवसेनेचे वजनदार आमदार रात्रीपासूनच नॉटरिचेबल आहेत. 



ठाण्याचे प्रताप सरनाईक, अंबरनाथचे बालाजी किणीकर, पालघरचे श्रीनिवास वनगा, भिवंडीचे शांताराम मोरे, बोरिवलीचे प्रकाश सुर्वे, कल्याणचे विश्वनाथ भोईर गायब आहेत. त्याशिवाय यवतमाळचे माजी मंत्री संजय राठोडही गायब आहे. रायगड जिल्ह्यातलेही शिवसेनेचे तीन आमदार नॉटरिचेबल आहेत. 


दरम्यान, हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे आणि भाजपच्या नेत्यांची बैठक झाल्याची माहिती सूत्रांची आहे. एकनाथ शिंदे यांची गुजरात प्रदेश अध्यक्ष सी. आर. पाटील यांच्याशी रात्रीच भेट झाल्याची सूत्रांची माहिती आहे. शिवसेना आमदार मंत्री तानाजी सावंतही नॉट रिचेबल असल्याची माहिती उघड होत आहे.