Lok Sabha Election Results 2024 Live : लोकसभा निवडणुकांचे सर्व निकाल जाहीर झाले आहेत. देशात सत्ताधारी एनडीएला 292 च्या आसपास जागा मिळतील, असं दिसत आहे. याउलट इंडिया आघाडीनं तब्बल 234 जागांवर मजल मारली आहे. महाराष्ट्रात  लोकसभा निकालाची चमत्कारिक आकडेवारी पहायला मिळाली आहे. ना शिवसेना, ना राष्ट्रवादी, ना भाजप... काँग्रेसच हाच महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. 


महाराष्ट्रात महायुतीला जोरदार धक्का


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्रात महायुतीला जोरदार धक्का बसलाय. तर महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी घेतली आहे. आतापर्यंतच्या निकालानुसार महाविकास आघाडी 29 जागांवर तर महायुतीला 18 जागा मिळाल्या आहेत. महाराष्ट्रात काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. काँग्रेसला राज्यात 13 जागा मिळाल्या आहेत.  त्यापाठोपाठ भाजपला 10 तर उद्धव ठाकरेंच्या पक्षाला 9 जागा मिळाल्या आहेत. शिंदे गट आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला प्रत्येकी 7 जागा मिळाल्यात आहेत. तर, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त एकच जागा मिळाली आहे.


महाराष्ट्रात महायुतीच्या पराभवाची कारणे


  • ठाकरे-पवारांनी काँग्रेसला तारलं आहे. 

  • महायुती 18 तर मविआला 29+1 जागांवर आघाडी मिळाली आहे, 

  • मुंबईवर ठाकरेंचं वर्चस्व पहायला मिळाले. ठाकरे गटाने  तीन जागा जिंकल्या आहेत. 

  • भाजप, शिवसेना आणि काँग्रेसला प्रत्येकी एक जागा जिंकल्या आहेत. 

  • पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांचीच जादू पहायला मिळाली. 

  • पश्चिम महाराष्ट्रात भाजप आणि अजित पवारांना मोठा झटका बसला आहे. 

  • पश्चिम महाराष्ट्रात अजितदादांची राष्ट्रवादी हद्दपार झाली आहे. 

  • विदर्भात काँग्रेसचा करिष्मा पहायला मिळाला. मविआला 8 जागा मिळाल्या आहेत. 

  •  असली-नकली वादात ठाकरे गट आणि  शरद पवार गटाने सरशी मारली आहे. 

  • शरद पवार- उद्धव ठाकरेंविषयी सहानुभूती पहायला मिळाली. 

  • वंचितचा काही ठिकाणी मविआला फटका बसला आहे, 

  •  मुंबईत मराठी-अमराठी वाद महायुती भोवला असल्याची देखील चर्चा आहे. 

  • एकगठ्ठा मुस्लिम, मराठी मतांचा मविआला फायदा झाला. 

  • काँग्रेस महाराष्ट्रातला सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. 

  • ग्रामिण भागातील नाराजी महायुतीला भोवली आहे.