बीड : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला. अनेक नवोदीत आमदारांना मंत्री पदे देण्यात आली. त्यामुळे अनुभवी आणि ज्येष्ठ नेते नाराज झाले आहेत. यामध्ये राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांचे नाव होते. त्यांनीही उघड नाराजी व्यक्त करत आपल्या आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचे स्पष्ट केली. मी राष्ट्रवादीचा सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात जोरदार भूकंप होण्याची शक्यता होती. त्यानंतर त्यांचे मन वळविण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री  धनंजय मुंडे यांची धावपळ उडाली. त्यांना सोळंके यांचे मन वळविण्यात यश आले आहे. त्यामुळे ते आता राजीनामा देणार नाही, असे सांगितले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 आमदार प्रकाश सोळंके नाराजी अखेर दूर झाल्याने राष्ट्रवादीचे घालमेल दूर झाली आहे. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने ते नाराज झाले होते. ते आमदाराकीचा राजीनामा देण्याच्याही तयारीत होते. मात्र त्यांना आज मुंबईत बोलवण्यात आले. मुंबईत त्यांच्याशी जयंत पाटील, धनंजय मुंडे, अजित पवार यांनी चर्चा केली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही सोळंके यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना माझी नाराजी दूर झाली असून राजीनामा देणार नसल्याचं सोळंके यांनी जाहीर केले आहे.