शोध निबंध कॉपी पेस्ट करणाऱ्या प्राध्यापकांना नोटीस
निधी मिळण्यासाठी संशोधन न करता प्राध्यापक इतर संशोधकांची साहित्यातून उचलेगिरी
पुणे : पुण्यातील सावित्री फुले पुणे विद्यापीठातील प्राध्यापकांनी आपले शोध निबंध कॉपी पेस्ट केल्याच पुढे आलंय. या प्राध्यापकांना विद्यापीठाने नोटीसा बजावल्या असून पहिल्यांदाच अशा प्रकारची कारवाई विद्यापीठाकडून केली जातीयं. प्राध्यापकांनी विविध क्षेत्रातील संशोधनात रस घ्यावा यासाठी विद्यापीठ निधी आणि केंद्राच्या विविध योजनांमधून लाखो रुपयांचा निधी दिला जातो.
मात्र हा निधी मिळण्यासाठी संशोधन न करता प्राध्यापक इतर संशोधक साहित्यातून उचलेगिरी करत आहेत.
नियमानुसार कारवाई
ज्या शोधनिबंधातील मजकुरात ३० ते ४० टक्के साधर्म्य आहे अशा प्राध्यापकांना परत शोधनिबंध द्यायला सांगितले आहेत.
मात्र शोधनिबंधातील मजकुरात ५० टक्क्यांहून अधिक साधर्म्य असणाऱ्या प्राध्यापकांना मात्र खुलासा देण्याची नोटीस बजावली आहे.
त्यांनी योग्य तो खुलासा न दिल्यास युजीसी च्या नियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याच विद्यापीठान सांगितलंय.