Sanjay Raut on MlLA :  ठाकरे गटाची बुलंद तोफ म्हणून ओळखले जाणारे संजय राऊत यांना पत्राचाळ प्रकरणात जामीन मंजुर झाला आहे. राऊत बाहेर येताच त्यांच्या समर्थकांनी जंगी स्वागत केलं. राऊत घरी गेल्यावर तिथं मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांनी गर्दी केली होती. यावेळी राऊतांनी बोलताना थेट विरोधी पक्षांना जाहीर आव्हान दिलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मागील तीन ते चार महिन्यात शिवसेनेला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र शिवसेना ही बुलंद आहे. त्यांना आता समजेल की त्यांनी किती मोठी चुक केली आहे. मला अटक करून त्यांनी देशाच्या राजकारणातील सर्वात मोठी चुक म्हणजे संजय राऊतांना अटक. मला 103 दिवस कारागृहात ठेवलं, आता मी 103 आमदार निवडून आणणार आणि पुढचा मुख्यमंत्री आपल्या शिवसेनेचाच होणार असा गर्जनाही संजय राऊत यांनी केली.


संजय राऊतांनी आमदार फुटल्यानंतरही शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार असल्याचं म्हटलं आहे. राऊतांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. त्यासोबतच मुंबई महापालिकेवर सेनेचाच भगवा फडकणार असल्याचंही राऊत म्हणाले.


दरम्यान, न्यायालयाने सांगितलं की, राऊतांनी गुन्हा केलेला नाही. मला कितीही वेळा अटक करा मी शिवसेनेला त्यागणार नाही. मी भगव्याबरोबर आलो आहे आणि भगव्यासोबतच जाईल, असंही राऊत म्हणाले.