वर्षाअखेरीस कोरोनाची संख्या दुप्पट, पाहा कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण
काळजी घ्या... कोरोना वेगानं वाढतोय
मुंबई : राज्यात पुन्हा कोरोना व्हायरसने डोकं वर काढलं आहे. कोरोनाचा धोका पुन्हा वाढल्याने राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. आज मध्यरात्रीपासून याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. आज राज्यात 8 हजार 67 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर यामध्ये ओमायक्रॉनग्रस्त रुग्ण देखील आहेत. महत्त्वाचं म्हणजे 1 हजार 766 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, तर दुसरीकडे 8 जणांचा कोरोनामुळे निधन झालं आहे.
कोरोनाची संख्या वाढत असल्यामुळे काळजी घेणं आणि कोरोना नियमांचं पालन करणं अत्यंत गरजेचं आहे. राज्यात सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 24 हजार 509 इतकी आहे. तर आतापर्यंत कोरोनाच्या विळख्यातून बाहेर आलेल्यांची संख्या 65,09,096 इतकी आहे.
कोणत्या जिल्ह्यात किती ओमायक्रॉन रुग्ण
जिल्हा कोरोना रुग्ण
1. मुंबई 327
2. पिंपरी चिंचवड 26
3. पुणे ग्रामीण 18
4. पुणे मनपा आणि ठाणे मनपा 12
5. कल्याण, डोंबिवली 7
6. नवी मुंबई, पनवेल प्रत्येकी 8
7. नागपूर आणि सातारा प्रत्येकी 6
8. उस्मानाबाद 5
9. वसई विरार 4
10. नांदेड 3
11. औरंगाबाद, बुलढाणा,
भिवंडी निजामपूर मनपा, मीरा भाईंदर प्रत्येकी 2
12. लातूर, अहमदनगर, अकोला, कोल्हापूर प्रत्येकी 1
कोरोनाच्या वाढत्या धोक्यामुळे राज्यात निर्बंध
वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा एकदा कठोर निर्बंध लागू करण्यात आलेत. 31 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून म्हणजे आजपासूनच हे निर्बंध लागू करण्यात आलेत. राज्यात राजकीय, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांवर निर्बंध लागू करण्यात आलेत.
केवळ 50 जणांच्या उपस्थितीत लग्नकार्य पार पाडावी लागणार. अंत्यसंस्कारांना केवळ 20 जणांना उपस्थित राहण्याची परवानगी आहे. पर्यटन स्थळं, समुद्र किनारे, गर्दी होणारी ठिकाणं अशा ठिकाणी निर्बंध लावण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आलेत.
मात्र दुकानं, मॉल, सिनेमागृह यांविषयी अजून आदेश जारी झालेले नाहीत. राज्यात कोरोना रूग्णसंख्या कमालीची वाढत आहे.