New Education Policy:  दहावी झाल्यानंतर विद्यार्थ्यांसमोर प्रश्न असतो तो शाखा निवडण्याचा, मग प्रत्येक जण आपल्या आवडीनुसार, कुवतीनुसार आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्सची निवड करतो. मात्र आता या शाखाच मोडीत निघणार आहेत. कारण एकाच वेळी अनेक विषयांचं शिक्षण देण्याची शिफारस राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यात करण्यात आली आहे. (Now Neither Science nor Commerce; So how will the new education policy be know details)


शिक्षण धोरणात शिफारशी कोणत्या?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नव्या धोरणानुसार आर्टस्, कॉमर्स, सायन्स मोडीत निघेल, विशिष्ट शाखा निवडण्याची गरज नाही. आठ विद्याशाखांमध्ये विषयांची विभागणी करण्यात आली असून विद्यार्थी एकूण 16 विषय निवडू शकतील. मात्र किमान 4 विषय एकाच विद्याशाखेतले निवडणं बंधनकारक असेल. याशिवाय 10 वी, 12 वीची बोर्ड सिस्टीम संपवण्यात येईल आणि 9 वी ते 12 वी शिक्षण एकसंध असेल. 


शिक्षणात सुसुत्रता यावी, विद्यार्थ्यांना सर्वसमावेशक शिक्षण घेता यावं यासाठी शैक्षणिक धोरणात बदल करण्यात येत असल्याचं सांगण्यात येतय. आता विद्यार्थी आणि पालकांना नवा बदल रूचणार का? हेच पाहावं लागेल. तर, नवीन शैक्षणिक धोरण येत्या वर्षापासून लागू होणार असल्याची माहिती दीपक केसरकर (Ministry of Education Deepak Kesarkar) यांनी दिली आहे. 10+2 ही शिक्षण पद्धत जाऊन त्याऐवजी 5+3+3+4 अशी नवी व्यवस्था लागू होईल.


आणखी वाचा - Rohit Pawar: रोहित पवार यांना वाटते 'या' व्यक्तीची भीती; कारणही सांगितलं, पाहा काय म्हणाले...


दरम्यान,  इंजिनियरिंग मेडिकल ही या पुढील काळात मराठीमध्ये शिकवलं जाणार आहे. नव्या शैक्षणिक धोरणाला मोदी सरकारने देखील मंजुरी दिली होती. त्यामुळे आता तब्बल 34 वर्षांनंतर देशात नवं शैक्षणिक धोरण लागू होणार आहे. त्यामुळे आता नवीन धोरणामुळे शैक्षणिक गोष्टींमध्ये सुधारणा होणार का? असा सवाल आता उपस्थित होताना दिसतोय.