दीपक भातुसे, झी मीडिया, नागपूर : भाजप सरकारने घेतलेला महत्वाचे निर्णय महाराष्ट्र विकास आघाडी सरकार बदलणार आहे. जनतेतून थेट नगराध्यक्ष, सरपंच निवडण्याची पद्धत रद्द केली जाणार आहे. पूर्वीप्रमाणे नगरसेवक नगराध्यक्ष निवडतील, तर ग्रामपंचायत सदस्य सरपंच निवडणार, अशी पद्धत पुन्हा लागू होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई वगळता सर्व महापालिका आणि नगरपालिकांमधील चार प्रभाग पद्धत रद्द करणार आहेत. पूर्वीप्रमाणे एक प्रभाग पद्दत लागू करण्याचा महाविकास आघाडीच्या हालचाली सुरू आहेत. याबाबत सरकार लवकरच निर्णय घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे.


फेब्रुवारी 2016 मध्ये भाजप सरकारने वरील दोन्ही निर्णय घेतले होते, पण उद्धव ठाकरे सरकार हे दोन्ही निर्णय बदलणार असल्याचं सांगण्यात येत आहे.


हा निर्णय का बदलला जात आहे?


अनेक नगरपालिकांमध्ये सत्ता एका पक्षाची तर नगराध्यक्ष दुसर्‍या पक्षाचा निवडून आलेला आहे, त्यामुळे सत्ता राबवताना गोंधळ होतोय, नगरसेवक नगराध्यक्षाला सहकार्य करत नाहीत.


कराडमध्ये काँग्रेसची सत्ता भाजपचा नगरसेवक आहे, विदर्भातील दर्यापूरमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता तर भाजपचा नगराध्यक्ष आहे. दर्यापूरमध्ये तर नगरसेवकांनी नगराध्यक्ष विरोधात अविश्वासाचा प्रस्ताव आणला आहे.