आघाडीत बिघाडी, या कारणावरून आता काँग्रेस जाणार न्यायालयात
सोडतीमध्ये निघालेले हे आरक्षण पूर्णपणे बायस, पूर्वग्रहदूषित असल्याचा आरोप भाई जगताप यांनी केला.
शिर्डी : मुंबई महानगरपालिका ( Mumbai Mahanagar Palika ) आरक्षणाची सोडत झाली. ही एक प्रक्रिया आहे, त्याची मार्गदर्शन तत्व आहेत. पण, काही विशिष्ट लोकांना खुश करण्यासाठी प्रभाग पुनर्र्चना करण्यात अली असा आरोप मुंबई प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप ( Bhai Jagtap ) यांनी केला.
दक्षिण मुंबईत ( South Mumbai ) 30 वॉर्ड आहेत. यात 21 महिला आरक्षण ( Mahila arkshan ) निघाले हे कसं शक्य होऊ शकतं? इतर ठिकाणीही काही प्रमाणात अशीच स्थिती आहे. मुंबई महापालिकेत काँग्रेसचे 29 नगरसेवक आहेत. त्यापैकी 21 जागांवर महिला आरक्षण पडले, हा काही योगायोग नाही.
गेल्या वेळी कुर्ला भागात आरक्षण नव्हतं पण यावेळी ते टाकलं आहे. 2012 मध्ये OBC महिला वॉर्ड होता. पण तो निकष आता कुठे लागतो? सोडतीमध्ये निघालेले हे आरक्षण पूर्णपणे बायस, पूर्वग्रहदूषित असल्याचा आरोप भाई जगताप यांनी केला.
महापालिका आयुक्त ( BMC Commisioner ) आणि शिवसेना ( Shivsena ) यांनी मिळून हे काम केले आहे. हा शिवसेनेचा डाव नाही तर काँग्रेसला ( Congress ) अधिक त्रास होईल यासाठीच हे करण्यात आल्याचे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. महापालिका आयुक्त यांनी कॉंग्रेसच्या हरकती आणि सूचना मान्य केल्या नाही तर ते आरक्षण सोडती विरोधात काँग्रेस न्यायालयात जाईल, असा इशाराही भाई जगताप यांनी दिला.