रत्नागिरी : कोकण रेल्वेमार्गावर होणारी गर्दी लक्षात घेऊन सुपर फास्ट एक्स्प्रेसला अधिकचा डब्बा जोडण्यात आला आहे. त्यामुळे तेजस एक्स्प्रेस आता १६ डब्यांची झाली आहे. नाताळची सुट्टी आणि नवीन वर्ष स्वागतासाठी गोव्यासह कोकणात येणाऱ्या पर्यटकांची गर्दी लक्षात घेता कोकण रेल्वे मार्गावर जादा गाड्यांचे नियोजन केले आहे. तसेच तेजस एक्स्प्रेसला होणारी गर्दी लक्षात घेऊन अधिकचे डब्बे जोडण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, कोकण रेल्वे मार्गावर आरक्षण फुल्ल असून तेजस गाडीचा डबा वाढविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला होता. तेजस एक्स्प्रेस आता १६ डब्यांची झाली आहे. क्यार वादळ आणि महावादळामुळे दिवाळीच्या सुट्टीत पर्यटकांनी कोकणाकडे पाठ फिरवली होती. मात्र नाताळच्या सुट्टीसाठी पर्यटकांची पुन्हा कोकणला पसंती मिळत आहे. तेजस एक्स्प्रेस ही नियमित १५ डब्यांची गाडी असते. मात्र ५ जानेवारीपर्यंत तेजस एक्स्प्रेसही १६ डब्यांची धावणार आहे. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.