Maharashtra State  OBC,  SEBC, EWS  Reservation :   OBC, SEBC आणि EWS संवर्गातील मुलींना राज्य सरकारनं मोठी भेट जाहीर केली आहे. OBC, SEBC, EWS संवर्गातील मुलींच्या उच्च शिक्षणात 100 टक्के फी सवलतीचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय झाला. उद्या याबाबतचा GR निघणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर याची अंमलबजावणी सुरु होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणा-या ओबीसी मुलींना फी माफी देण्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवारांनी यंदाच्या बजेटमध्ये केली. केवळ मेडिकलच नाही तर अभियांत्रिकी, फार्मसी, मॅनेजमेंट, लॉ अशा विविध शाखांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या लाखो विद्यार्थिनी याचा फायदा होणार आहे. या अभ्यासक्रमांबरोबरच राज्यातील deemd प्रकारात मोडणाऱ्या मेडिकल कॉलेजेसची प्रवेश प्रक्रिया पुढील दोन दिवसात सुरू होणाराय... प्रत्येक अभ्यासक्रम आणि कॉलेजची फी वेगवेगळी असते. कॉलेजची फी किती आहे, याचा विचार करून पालक प्रवेशाचा प्राधान्यक्रम ठरवतात. अर्थमंत्री अजित पवारांनी फीमाफीची घोषणा केली.


अर्थमंत्री अजित पवारांनी केलेल्या घो।णेची अंमलबजावणी कधी होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. अखेर या घोषणेची प्रत्यक्षात अंमलबजावणी होण्याबाबात निर्णय झाला आहे.  GR जाहीर जाहीर झाल्यानंतर राज्यभरातील OBC, SEBC आणि EWS संवर्गातील मुलींना उच्च शिक्षणात 100 टक्के फी सवलतीचा लाभ घेता येणार आहे.