तिरंग्याचा अपमान, मिरवणुकीत आक्षेपार्ह घोषणा; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गंभीर दखल, दिले चौकशीचे आदेश
Devendra Fadnavis News : धुळ्यातल्या ईद ए मिलादच्या जुलूसातील `सर तन से जुदा` या घोषणाबाजीच्या `झी 24 तास`च्या बातमीची गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने गंभीर दखल घेतली आहे.
धुळे : Devendra Fadnavis News : धुळ्यातल्या ईद ए मिलादच्या जुलूसातील 'सर तन से जुदा' या घोषणाबाजीच्या 'झी 24 तास'च्या बातमीची गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने गंभीर दखल घेतली आहे. 'झी 24 तास'ने ही बातमी दाखवल्यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिलेत. गृहमंत्र्यांनी पोलिसांना तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेत. ( Devendra Fadnavis inquiry order of Offensive slogans in Dhule procession)
दरम्यान, अमरावतीनंतर धुळ्यात ईद-ए-मिलादच्या मिरवणुकीत आक्षेपार्ह घोषणा आणि राष्ट्रध्वजात तिरंगाचा अपमान केल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. ईदच्या दिवशी मिरवणूकीत या घोषणा देण्यात आला. या प्रकरणी आझाद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या सर्व प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजपने पोलिसांत तक्रार केली. व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी आयोजकांवर गुन्हे दाखल केले आहेत. हिंदू धर्मियांना धमकवण्याचा प्रयत्नही यावेळी करण्यात आल्याचा आरोप भाजपने केला आहे.