लैलेश बारगजे, झी मीडिया, अहमदनगर : अहमदनगर महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने कर्मचाऱ्यांना वादग्रस्त ऑफर देली आहे. 'एक झाड लावा, एक क्वार्टर मिळवा' अशी ऑफर या अधिकाऱ्याने दिली होती. या वादग्रस्त ऑफर देणाऱ्या अधिकाऱ्याला काही दिवस घरी बसवण्याची शिक्षा महापालिका आयुक्तांनी दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झाडे लावण्यासारखे पवित्र कार्य नाही. पण झाडे लावण्याच्या मोबदल्यात तुम्हाला कोण व्यसनाधिनतेकडे नेत असेल तर मात्र त्याचे कधीच समर्थन करता येणार नाही. अहमदनगर महापालिकेचा स्वच्छता निरीक्षक के. के. देशमुख यांनी ही वादग्रस्त ऑफर महापालिकेच्या मुकादमांना दिली. 


एक झाड पावसाळ्यात लावा आणि थंडीत क्वार्टर मिळवा असा संदेशचं त्याने महापालिकेच्या व्हॉट्सअॅप ग्रूपवर टाकला. या संदेशानंतर महापालिका वर्तुळात खळबळ माजली. महापालिका आयुक्तांनी ही ऑफर देणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करत त्याला निलंबित केले आहे.