ओला ड्रायव्हर ते आर्मी... ओमचा यशस्वी प्रवास
शहरांमध्ये प्रवास करताना अनेकदा गप्पा होत असतात.
मुंबई : शहरांमध्ये प्रवास करताना अनेकदा गप्पा होत असतात.
त्या गप्पा कधी कुणाच्या फायद्याच्या ठरतील हे आपण सांगू शकत नाही. असंच एक उदाहरण आहे पुण्यातील ओम पैठणेचं. ओम पुण्यात ओला ड्रायव्हर म्हणून काम करत होता. पण आता ओम हा सैन्य दलात रूजू झाला आहे. ओला ड्रायव्हर ते सैन्यदलातील अधिकारी म्हणून ओम पैठणेचा आतापर्यंतचा प्रवास.
ओला ड्रायव्हर ते आर्मी पर्यंतचा प्रवास
काम करीत असतानाच त्याने "संयुक्त लष्करी सेवा' ची परीक्षेचा अभ्यास करून ती उत्तीर्ण झाला. सध्या तो चेन्नई येथील "अधिकारी प्रशिक्षण प्रबोधिनी' येथे प्रशिक्षण घेत असून, येत्या दहा मार्च रोजी भारतीय सैन्यदलात "लेफ्टनंट' पदावर रुजू होणार आहे. ओम मूळचा बीड जिल्ह्यातील लिंबारूई गावचा आहे. त्यानंतर पुणे जिल्ह्यातील सारोळा गलत असलेल्या तोंडल गावात स्थायिक झाला. ओमचे वडिल एका कुक्कुटपालन व्यवसायाच्या गाडीवर वडील चालक म्हणून काम करीत होते. वडिलांच्या दोन्ही गुडघ्यांना इजा झाल्यामुळे गुडघा प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया झाल्या, पण त्यातील एकच शस्त्रक्रिया यशस्वी झाली. त्यानंतर पुणे शहरात आल्यापासून ते एका कंपनीमध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम करीत आहेत.
अशी झाली कर्नल सोबत ओळख
ओम बीएससीचं शिक्षण घेत असताना काही विषयांमध्ये नापास झालो होतो, राहिलेल्या विषयांचा अभ्यासदेखील सुरू होता. दरम्यान, घरच्या जबाबदारीमुळे माझा मित्र राहुल भालेराव याच्या गाडीवर चालक म्हणून काम करीत होतो. अशीच त्याची ओळख निवृत्त कर्नल यांच्याशी झाली. प्रवासादरम्यान त्या दोघांच्या छान गप्पा मारत होते. त्या वेळी त्यांनीच कर्नल यांनी "सीडीएस' परीक्षेबद्दल माहिती सांगितली. लेफ्टनंट कर्नल गणेश बाबू यांचा पत्ता देऊन त्यांच्याकडे प्रशिक्षण घेण्याचा सल्लाही दिला. त्यानंतर 2016 मध्ये झालेल्या "सीडीएस'च्या परीक्षेमध्ये पहिल्याच प्रयत्नात ओम उत्तीर्ण झाला. त्यानंतर भोपाळ येथे "सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड'ची परीक्षा उत्तीर्ण होऊन चेन्नईमध्ये "ओटीए'मधून प्रशिक्षण पूर्ण केले. आता ओमने भारतीय सैन्यदलात "लेफ्टनंट' पदावर रुजू होणार आहे,'' असे ओम याने सांगितले.
ओमचा हा प्रवास खरंच कौतुकास्पद आणि बरंच काही शिवकणारा आहे. कोणतंही काम लहान नसतं. त्याच कामातून तुम्हाला महत्वाचं आणि मोठी गोष्टी कळते.