अकोल्यात २० लाखांच्या ५००-१०००च्या जुन्या नोटा जप्त
अकोल्यात पोलिसांनी चलनातून बाद झालेली २० लाखांची रोकड पकडली आहे.
अकोला : अकोल्यात पोलिसांनी चलनातून बाद झालेली २० लाखांची रोकड पकडली आहे. काल रात्री खोलेश्वर परिसरात स्थानिक गुन्हे शाखेनं ही कारवाई केलीये. जप्त करण्यात आलेल्या रोकडमध्ये १००० आणि ५०० च्या जून्या नोटांचा समावेश आहे. यामध्ये हजारच्या नोटांची रक्कम ९ लाख तर पाचशेंच्या नोटांची किंमत ११ लाख एवढी आहे.
स्थानिक गुन्हे शाखेनं याप्रकरणी कौलखेड भागातील रहिवाशी असलेल्या राकेश तोहगावकर नामक व्यक्ती ताब्यात घेतलंय. राकेश नोटा बदलविण्यासाठी खोलेश्वर भागात येणार असल्याची गुप्त माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यावरून सापळा रचत पोलीसांनी राकेशला जून्या नोटांसह अटक केली आहे.