नाशिक : जुन्या कसारा घाटात मुंबई-नाशिक हायवेवर रस्त्यात दरड कोसळली आहे. दरड कोसळल्यानं पहाटेपासून घाटातील मुंबई आणि नाशिक दोन्ही दिशेनं जाणारी वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुसळधार पावसामुळे पहाटे ही दरड कोसळल्याचं सांगण्यात येत आहे. यामुळे जुन्या कसारा घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळत आहे.


दरम्यान, या स्थळी पोलीस आणि प्रशासन पोहोचलं असून, दरड हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे. दुसरीकडे नाशिक आणि आसपासच्या परिसरात मुसळधार पाऊस सुरु आहे.


दुसरीकडे मुसळधार पावसाने घोटी-सिन्नर महामार्गवरील पुलाला अनेक ठिकाणी मोठी भगदाडं पडली आहेत. त्याच्या दुरूस्तीसाठी महामार्गावरील दोन्ही दिशेची वाहतूक बंद राहणार आहे. स्थानिकांनी अनेकवेळा पुलाच्या दुरूस्तीसाठी प्रशासनाकडे विनंती केली होती.


मात्र प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने आता ऐन पावसाळ्यात दुरूस्तीचं काम हाती घ्यावं लागलं आहे. पूल बंद करण्यात आल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करण्याची तयारी ठेवावी लागणार आहे.