सातारा : आदर्की खुर्द गावचे 78 वर्षांचे आजोबा रामदास बोडके त्यांना 1973 साली  पोटदुखीचा त्रास सुरू झाला. अनेक इलाज केले, पण पोटदुखी काही थांबेना, तेव्हा गावातल्याच वयस्कर आजींनी त्यांना खास उपाय सांगितला काळ्या शेतातील माती कोळून पिल्यास पोटदुखी अगदी बरी होईल, असे आजींनी सांगितले आणि काय आश्चर्य खरंच त्यांची पोटदुखी थांबली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण तेव्हापासून रामदास बोडके यांना मुरुमाचे खडे खाण्याची सवय लागली. गेली 31 वर्षं ते दररोज  मातीतले  खडे खातायत. दर दिवशी 250 ग्रॅम मुरुमाचे खडे, ते कडाकडा दातांनी चावून खातात.



या आजोबांना आता दगड खाण्याचं व्यसनच लागलंय. घरच्यांनी त्यांची ही सवय मोडण्याचा खूप प्रयत्न केला, पण काही केल्या त्यांची ही सवय काही सुटत नाही आहे. दगडाचे खडे खाणे हा आजार आहे आणि त्यामुळे दुष्परिणाम होऊ शकतात, असं डॉक्टरांच मत आहे.


दगड खाण्याच्या गावठी इलाजानं आजोबांचा आजार तर बरा झाला, पण दगड खाण्याची घातक सवय मात्र  त्यांना आता लागली आहे. कधी भविष्यात याचे असे दुष्परिणाम त्यांना भोगावे लागतील, असा त्यांनी विचारही केला नसावा.