एक लाख झाडं समाज कंटकांनी जाळून टाकली
लोकसहभागातून मंगरुळच्या डोगरात लागवड केलेली एक लाख झाडं समाज कंटकांनी जाळून टाकली. या भागाची खासदार श्रीकांत शिंदेंनी पाहाणी केली.
ठाणे : लोकसहभागातून मंगरुळच्या डोगरात लागवड केलेली एक लाख झाडं समाज कंटकांनी जाळून टाकली. या भागाची खासदार श्रीकांत शिंदेंनी पाहाणी केली.
या पाहणी दौऱ्यात वनव्यामुळे किती वृक्षांचे नुकसान झाले आहे याचं नोंद करण्यात आली.तसेच याप्रकरणी पोलीस ठाण्यात अज्ञात इसमांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किती ही अडचणी आल्या तरी आमचा मानवनिर्मित जंगल निर्माण करण्याच जो उद्देश आहे तो पूर्ण करणार असल्याचा विश्वास खासदार श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला आहे.तर होरपललेल्या वृक्षांना जगवण्यासाठी वनविभाग प्रयत्न करत असल्याचे वणाधिकाऱ्यांनी सांगितले.