Mumbai- Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेल्या कित्येत वर्षांपासून रखडले आहे. ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळं रस्त्यांची अक्षरशा चाळण झाली आहे. आता गणेशोत्सवाच्या निमित्ताने लाखो चाकरमानी कोकणात धाव घेतील. त्यापूर्वीच मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम तातडीने पूर्ण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने उपाययोजना हाती घेतल्या आहेत. गणपतीच्या आधी या महामार्गावरील एका लेनचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत मंगळवारी भाष्य केले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेल्या बारा वर्षांपासून रखडले आहे. महामार्गाचे काम जलद गतीने पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने आता आधुनिक तंत्रज्ञान वापरले आहे. त्यामाध्यमातून रस्त्यावर पडलेल्या खडड्यांमुळं खडबडीत झालेला रस्ता गणेशोत्सवापूर्वी चांगला व्हावा यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. सिमेंट ट्रिटेड बेस हे नवीन अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून हे काम सुरु करण्यात आलं आहे.


मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामात ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून तातडीच्या उपाययोजना करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग प्रयत्नशील आहे. गणपतीच्या आधी या महामार्गावरील एका लेनचे काम पूर्ण करण्याचा विचार आहे. 
मुंबई- सिंधुदुर्ग मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवालाचे काम अंतिम टप्प्यात आहे. समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून अठरा तासांचा प्रवास आठ ते दहा तासांवर आला आहे. शेतकरी,प्रवासी यासोबत उद्योग संधी विस्तारण्याच्या दृष्टीने हा उपयुक्त ठरत आहे. अशा विविध दळणवळण सुविधांच्या विस्ताराला शासनाने प्राधान्यक्रमावर घेतले असून कोकणातही या पद्धतीने दळणवळण सुविधांचा विस्तार करण्यात येईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. 


दरम्यान, मुंबई-गोवा महामार्गाच्या पनवेल ते पेण या तालुक्याच्या ठिकाणी महामार्गाचे काम सुरू आहे. त्याभागात रस्त्यावर अनेक ठिकाणी भेगा पडल्या असून, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) त्या काँक्रिटने भरल्या आहेत. मात्र, महामार्गावर सहा इंच काँक्रीटचा थर वापरला गेलेल्या थरामुळं या महामार्गाचे काम टिकणार नसल्याचा आरोप कार्यकर्ते आणि स्थानिकांनी केला आहे. 


महामार्ग बांधताना त्यात केवळ काँक्रीट स्लॅबचा वापर करण्यात आला आहे. त्यात स्टील वापरला नसल्याने क्राँक्रीट स्लॅब अवजड वाहनांचा भार सहन करु शकणार नाही. कमकुवत पृष्ठभागामुळं रत्यांवर असंख्य खड्डे पडले आहेत, असा आरोप एका कार्यकर्त्यांनी केला आहे.