कोल्हापूर : कोरोना व्हायरसचा फैलाव दिवसागणिक वाढतानाच दिसत आहे. कोल्हापुरात कोरोनाचा नवा रुग्ण सापडला आहे. त्यामुळे अधिक परिस्थिती गंभीर होत आहे. आता कोल्हापुरात कोरोना रुग्णांची संख्या ३ वर पोहोचली आहे. हा रुग्ण त्याच्या नातेवाईकाच्या संपर्कात आला होता. नातेवाईकाला देखील संपर्क झाला होता. आता या नव्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा तपास सुरू करण्यात आला आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या व्यक्तीने आपल्यात कोरोनाची लक्षणे असल्याचे लपवले होते. त्यामुळे कोल्हापूरच्या भक्तीनगर भागात एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी सध्या ३१ जणांवर कोरोना व्हायरसची चाचणी करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. कोरोना व्हायरसचा वाढता आकडा लक्षात घेत प्रत्येकाने आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेणं अत्यंत गरजेचं असल्याचं वारंवार सांगण्यात येत आहे. 


राज्यात आता कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या २०३ वर गेली आहे तर यामध्ये मुंबईतील  रुग्ण अधिक आहेत.  तर नाशिकमध्ये देखील कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला आहे. नाशिकच्या निफाड लासलगावमध्ये कोरोनाग्रस्त रुग्ण सापडला आहे.