नागपुरात गोमांस संशयावरुन गोरक्षकांची एकाला मारहाण
एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी गोरक्षकांना हिंसा करू नये म्हणून समज देत असतानाच, दुसरीकडे अशा प्रकारच्या घटना सुरूच असल्याचे परत एकदा सिद्ध झाले आहे. नागपूर जिल्ह्याच्या नरखेड तालुक्यात अशीच एक घटना घडली आहे.
नागपूर : एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी गोरक्षकांना हिंसा करू नये म्हणून समज देत असतानाच, दुसरीकडे अशा प्रकारच्या घटना सुरूच असल्याचे परत एकदा सिद्ध झाले आहे. नागपूर जिल्ह्याच्या नरखेड तालुक्यात अशीच एक घटना घडली आहे.
नरखेड तालुक्यातील भारसिंगी गावात सलीम इस्माईल शाह नावाच्या व्यक्तीला गोरक्षकानी आपल्या दुचाकी गाडीत गोमांस नेत असल्याचा आरोपावरून मारहाण केली. सलीमच्या गाडीत गोमांस असल्याचा आरोप लावत गोरक्षकांनी त्याला लाथा-बुक्क्यांनी मारले.
या घटनेची माहिती मिळतच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि सलीमला जमावाच्या तावडीतून सोडवले. नरखेड पोलिसांनी ४ व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून, गाडीत सापडलेले मांस परीक्षणासाठी प्रयोग शाळेत पाठवले आहे.