COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात पहिला पाऊस पडताच जंगलात उगविणारी रानभाजी तोडण्यासाठी जंगलात गेलेल्या महिलांवर वाघाने हल्ला चढवलाय. वाघाच्या हल्ल्यात महिला ठार झाली आहे. ही घटना चिमूर तालुक्यातील केवाडा जंगलातील असून देवांगना निकेसर मृत महिलेचे नाव आहे.


या भागातील महादवाडी येथील काही महिला 'कुड्याची फुले' वेचण्यासाठी जंगलात गेल्या होत्या. आज सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास झुडुपात असलेल्या वाघाने या महिलांवर हल्ला केला. वाघाने केलेल्या या हल्ल्यात देवांगना हिचा मृत्यू झाला. 


वाघाने हल्ला करताच महिलांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. त्यानंतर वाघ पसार झाला. या हल्ल्यातील ३ जखमी महिलांना चिमूरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 


दरम्यान वनपथक घटनास्थळी दाखल झाले असून पुढील कारवाई केली जात आहे.