कांदा लिलाव : शरद पवार यांची यशस्वी मध्यस्थी, उद्यापासून कांदा खरेदी
कांदा उत्पादकांना दिलासा देणारी बातमी.
नाशिक : कांदा उत्पादकांना दिलासा देणारी बातमी. उद्यापासून कांदा खरेदी सुरू होणार आहेत. यासंदर्भात उद्या जिल्ह्याधिकाऱ्यांसोबत एक महत्त्वाची बैठक होत आहे. बैठकीत तोडगा निघाल्यानंतर लिलाव सुरू होणार आहेत. गेल्या तीन दिवसांपासून नाशिकमधिल बाजार समित्यांमधील कांदा लिलाव बंद होते.
व्यापाऱ्यांनी बाजार बंद करणं अयोग्य बोलून समस्या सोडवू व्यवहार सुरू करा, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कांदा व्यापाऱ्यांना आवाहन केले आहे. नाशिकमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दरम्यान कांदा निर्यातीबाबतचा निर्णय केंद्राच्या अख्त्यारीत येतो. यात राज्य सरकार काहीही करु शकत नाही. त्यामुळे कांदा प्रश्नावर बोलण्यासाठी एक शिष्टमंडळ दिल्लीला जाणा असल्याची माहिती पवारांनी दिली.
तीन दिवसांपासून कांदा लिलाव ठप्प आहेत. लिलाव बंद असल्यानं शेतकऱ्यांचं मोठे आर्थिक नुकसान होत आहे. कांदा प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या उपस्थितीत बैठक झाली. याबैठकीनंतर पवार बोतल होते.