मुंबई : कांद्याचे दर पुन्हा एकदा गगनाला भिडले आहेत. कांदा 100 रुपये प्रति किलो झाला आहे. अफगाणिस्तानातून येणाऱ्या कांद्याचा स्तर खालावल्यामुळे व्यापाऱ्यांनी हा कांदा खरेदी करण्यास नकार दिला आहे. तज्ञांच्या माहितीनुसार, 15 डिसेंबरपर्यंत कांद्याच्या दरात कोणतीही कपात होणार नाही. दिल्लीत 1500-2000 टन कांद्याची आवक होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वातावरणातील बदलाचा मोठा फटका कांद्याला बसला आहे. भाजी मंडईत कांद्याचा भाव 35 ते 60 रुपये प्रति किलो असा होता. मात्र आता 90 रुपयांचा आकडा कांद्याच्या दरांनी गाठला आहे. लवकरच ते 100 रुपये प्रति किलो होणार आहे. ग्राहकांना आशा आहे की, अफगाणिस्तानमधून लवकरच कांदा चांगल्या क्वालिटीचा येईल. 


मात्र खराब क्वालिटीच्या कांद्यामुळे व्यापारी हा कांदा विकत घेत नाहीत. ऑनियन ट्रेडर्स असोसिएशनचे श्रीकांत मिश्रा यांनी सांगितल्यानुसार, नाशिक, गुजरात, कर्नाटकमध्ये खराब हवामानामुळे कांदा दिल्लीत पोहोचला नाही. फक्त राजस्थानच्या अलवरहून दिल्लीत कांदा पोहचत आहे. दररोज चार ते पाच हजार टन कांदा दिल्लीत पोहोचत आहे. अफगाणिस्तानमधून 140 टन कांदा आला असून 35 रुपये दराने आहे. मात्र याचा दर्जा अतिशय खराब आहे. 


तसेच नवीन बटाट येऊनही दरात कोणताही बदल झालेला नाही. बाजारात बटाटा 30 रुपये प्रति किलोला मिळत आहे. इतर भाज्यांबद्दल बोलायचं झालं तर मटर 80 रुपये प्रति किलो असून दुधी 60 रुपये किलो आहे. टोमॅटोच्या दरात कपात झाली असून 40 रुपये प्रति किलो आहे. पडवल मात्र 80 रुपये किलो आहे.