लवकरच कांद्याची किंमत होणार १०० रूपये किलो
अंड्यांपाठोपाठ आता कांद्यांच्या दरात देखील वाढ होण्याची दाट शक्यता आहे.
मुंबई : अंड्यांपाठोपाठ आता कांद्यांच्या दरात देखील वाढ होण्याची दाट शक्यता आहे.
महाराष्ट्राच्या बाजारात गुरूवारी कांदा ४५ ते ५० रुपये दराने विकला गेला. गेल्या आठवड्यात कांद्याचा दर हा २० ते ३० रुपये किलो इतका होता.
एपीएमसीच्या माहितीनुसार, कांदा कमी असल्यामुळे येणाऱ्या काही दिवसांमध्ये तिपटीने वाढण्याची दाट शक्यता आहे. एपएमसीचे व्यावसायीक अशोल वाळुंजे यांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या
अवकाळी झालेल्या पावसामुळे कांद्यांच्या शेतीला भरपूर मोठे नुकसान झाले आहे. दररोज कांद्याचे जवळपास १२५ ते १५० ट्रक लोड होत असतात मात्र गुरूवारी फक्त ८० ट्रक लोड झाले आहेत. त्यामुळे जुना कांदा संपल्यामुळे आताच्या कांद्याच्या दरात वाढ झाली आहे.
का वाढला कांद्याचा दर
एशियातील सर्वात मोठी कांद्याची उलाढाल ही नाशिकच्या लासलगावात होत असते. तिथे कांद्याचा दर हा ४० ते ४५ रुपये प्रती किलो असा आहे. वाळुंजे यांनी हे देखील सांगितले की, यंदा पावसाळा बराच लांबला त्यामुळे कांद्यांच्या शेतीला भरपूर नुकसान झाले. त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये कांद्यांच्या दरात वाढ होण्याची दाट शक्यता आहे.
तेव्हा हा कांदा गगनालाच भिडेल. कांदा १०० रुपये प्रति किलो होणार आहे.
निर्यात दर ८५० डॉलर प्रति टन
यंदा सरकारने २२ नोव्हेंबर रोजी कांदाचा एमइपी दर ८५० डॉलर प्रती टन ठरवला आहे. सरकारने कांद्याच्या दरांवर अंकुश ठेवण्याचा यातून प्रयत्न केला आहे. कांद्याची निर्यात आता ८५० डॉलर प्रती टन दरापेक्षा कमी दरात केला जाणार नाही. सरकारने या अगोदर डिसेंबर २०१५ मध्ये कांद्याचा एमइपी दर संपवला आहे.